ममताबाई भांगरे यांची परसबाग - भाग १| Mamatabai Bhangare | सन्मान नारी शक्तीचा | Gavakadache Vlog
Gavakadche Vlog Gavakadche Vlog
48.4K subscribers
209,682 views
2.7K

 Published On Feb 9, 2020

ममताबाईंची परसबाग

आजूबाजूने असलेली सह्याद्रीची उंचच उंच डोंगररांग. वरच्या अंगाला असलेला महाकाळ डोंगर आणि खालच्या अंगाला वसलेले देवगाव. ज्या गावापासून खऱ्या अर्थाने बंडकऱ्यांच्या बंडाला सुरुवात झाली आणि एक नवा पराक्रमी इतिहास या सह्याद्रीत रचला गेला. तेच गाव आजही एका वेगळ्या कार्याचे साक्षिदार होत आहे. ते कारण म्हणजे येथे असणारी ममताबाई भांगरे यांची परसबाग.
ममताबाई देवराम भांगरे यांनी आपल्या छंदातून परसबाग निर्माण केली होतीच. त्यांचे हे काम बायफ संस्थेने पाहिले आणि त्याच्या कार्याला मार्गदर्शन सुरु केले. त्यातून उभी राहिली आगळी वेगळी परसबाग. देशी बियाणांची परसबाग. राणभाज्यांची परसबाग. औषधी वनस्पतींची परसबाग. पारंपरिक साधनांच्या वापरासोबत बायोगॅस सारख्या आधुनिक तंत्राचाही वापर करावा अशी संकल्पणा सत्यात आणणारी परसबाग.
या परसबागेत ममताबाईंनी देशी बियाणांचं संवर्धन केलं आहे. राणभाज्या देखील आपल्या घराशेजारीच तयार केल्या आहेत. त्यांच्या अंगणात असलेला बोगणवेल म्हणजे खुप विशेष. त्यापासून अंगणात मोठा मंडपच तयार केलेला आहे. त्या मंडपावर अनेक प्रकारचे पक्षी सुध्दा नियमीत येत असतात. चिमण्या तर इतक्या आहेत की त्या जशा की ममताबाईंच्या कुटूंबाचाच भाग आहेत आणि अंगणात त्यांचा खुप सहज वावर आहे.
या परसबागेला एकदा भेट द्यावी अशीच ही परसबाग आहे.


या परसबागेतून आपल्याला काही बियाणे हवे असतील तर प्रत्यक्ष भेट देऊन ते घेता येतील. परंतू भेटीला जाण्याअगोदर फोन करुनच जावे.

गाव - देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
देवराम भांगरे - 9529365687
- 8007114309

Google Map Location link -
Deogaon, Maharashtra 422604
https://goo.gl/maps/QxPwwM2PJDrRydD47


ज्यांना भेट देणे शक्य नाही त्यांनी बायफ ऑफिस - अकोले येथे संपर्क करून पाहिजे ते बियाणे मिळवू शकता.
संपर्क - योगेश नवले - 7588026360
(बायफ ऑफिस - अकोले)

show more

Share/Embed